बी-टाउनची चर्चित जोडी रणबीर-कतरिना यांच्यात केवळ मैत्रीचे संबंध नसल्याची खात्री बॉलिवूड चाहत्यांना निश्चितच झाली असेल. या दोघांनीही आपल्यात प्रेमसंबंध असल्याचे अद्याप स्वीकारलेले नाही. दोघेही अलीकडेच निखिल अडवाणीच्या ‘डी-डे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी एकाच कारमधून येताना आढळले. या दोघांची एकत्रित येतानाची छायाचित्रेही प्राप्त झाली आहेत. तसेच, नुकतेच आमिर खानच्या निवासस्थानी झालेल्या ‘शीप ऑफ थिसस’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही रणबीर-कतरिना उपस्थित होते. १६ जुलैला कतरिनाचा वाढदिवस झाला. त्यावेळी रणबीरने तिला खास ज्वेलरी भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Story img Loader