दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या बहुप्रतिक्षित ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे गुरुवारी अनावरण होत आहे. चित्रपटकर्ता अनुराग कश्यप यांनी टि्वटरच्या माध्यमातून यास दुजोरा दिला आहे. ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ पुस्तकावर आधारीत या चित्रपटात मुंबईतील १९५० आणि १९६० चा काळ दर्शविण्यात आला आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता रणबीर कपूर एक बॉक्सर आणि स्ट्रिट फायटरची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘फॅण्टम फिल्म्स’ आणि ‘फॉक्स स्टार इंण्डिया’यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात अनुष्का शर्मा, करण जोहर, के के मेनन, मनिष चौधरी, सिद्धार्थ बासू आणि रेमो फर्नांडीस यांच्यादेखील भूमिका आहेत. १५ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात करण जोहर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जाते.

Story img Loader