रणबीर-कतरिना या दोघांच्या स्पेनमधील सुट्टीचे फोटो मिडियामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी मोठं वादळ उठलं होतं. रणबीरच्या कुटुंबीयांनी देखील त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सध्या ही जोडी कॅमेरा कॉन्शस झाली आहे.
काही दिवसांपासून या जोडीच्या प्रेमप्रकरणाचीच चर्चा आहे. मात्र, स्पेनमध्ये सुट्टी साजरी करणा-या या दोघांनीही जाहिरातीकरिता एकत्र काम करण्यास नकार दिला आहे. रणबीर-कतरिनाला एका हेल्थ ड्रिंकच्या जाहिरातीत काम करण्याचा प्रस्ताव आला होता. परंतु, या दोघांनीही तो फेटाळून लावला आहे. सध्या हे दोघेही एकत्र काम करु इच्छित नसल्याचे कळते. यापूर्वीही त्यांनी एका हेअर ऑईलची जाहिरात सोबत करण्यास होकार देऊन नंतर मात्र एकत्र काम करण्यास नकार दिला. त्यामुळे या दोघांच्याही चाहत्यांना आता त्यांना एकत्र पाहण्यासाठी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.
रणबीर-कतरिना नाही दिसणार एकत्र
रणबीर-कतरिना या दोघांच्या स्पेनमधील सुट्टीचे फोटो मिडियामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी मोठं वादळ उठलं होतं.
First published on: 15-10-2013 at 11:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir katrina dont want to sign any endorsements together