अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. चित्रपट अथवा कोणतीही भूमिका रणदीप हुड्डा नेहमीच त्यासाठी बरीच मेहनत घेताना दिसतो आणि हे त्याच्या चित्रपटांमध्ये दिसून येतं. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच तो महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

रणदीप हुड्डा एक फिट अभिनेता आहे आणि फिटनेसमुळे तो चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहे. रणदीप हुड्डा त्याच्या प्रत्येक लूकवर खूप गांभीर्याने काम करतो. अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठीही असेच काहीसे केले आहे. रणदीप हुड्डा त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे. ज्यासाठी त्याने आपले वजन खूप कमी केले आहे. हे त्याने शेअर केलेल्या फोटोमधून दिसून येत आहे.
आणखी वाचा- ‘आता तुमच्या भावना दुखत नाहीत का?’ प्रकाश राज यांनी गणपतींचे ‘हे’ फोटो शेअर करत विचारला प्रश्न

अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या आगामी चित्रपट ‘स्वातंत्रवीर सावरकर’साठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. अभिनेत्याने मे महिन्यात त्याच्या चित्रपटाची घोषणा केली होती. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून रणदीप हुड्डा त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाने काही दिवसांपूर्वी एका मीडिया मुलाखतीत सांगितले होते की, या भूमिकेसाठी त्याने आतापर्यंत १८ किलो वजन कमी केले आहे.

आणखी वाचा- महेश मांजरेकरांच्या महत्त्वकांक्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक समोर, ‘हा’ अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका

१ सप्टेंबरला अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचा ट्रान्सफॉर्मेशन लुक सेल्फी शेअर केला होता. फोटोमध्ये रणदीप हुड्डा लिफ्टमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आपल्याला सर्वांनाच कधीतरी लिफ्टची गरज आहे.’ फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की रणदीपने वजन कमी केले आहे.

Story img Loader