अभिनेता आणि दिग्दर्शक रणधीर कपूर यांनी त्यांचे वडिल राज कपूर यांच्या आर.के फिल्म्स बॅनरला पुन्हा सुरु करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
रणधीर म्हणाले की, लवकरच आर.के फिल्म्स पुढील एका वर्षात नवीन चित्रपटांच्या निर्मितीस सुरुवात करणार असून यात नवीन दिग्दर्शक, संगीतकार आणि कलाकारांचा समावेश असेल. हे सर्वजण आम्हाला आताच्या प्रेक्षकांची मानसिकता समजून घेण्यास मदत करतील. गेल्या ८० वर्षात आम्ही तुमचे मनोरंजन केले आहे आणि तसेच पुढेही करत राहू.
१९४८ साली स्थापन करण्यात आलेल्या आर.के बॅनरचा पहिला चित्रपट ‘आग’ अयशस्वी राहिला. मात्र, ‘बरसात’ चित्रपटाने या बॅनरला यश मिळाले आणि तोच बॅनरचा लोगो म्हणून प्रस्थापित करण्यात आला. यानंतर कपूर यांनी या बॅनरकरिता ‘आवारा’, ‘बूट पॉलिश’, ‘जागते रहो’, ‘श्री ४२०’ आणि इतर काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा