बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या दोघी बहिणी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत त्यांच प्रेम व्यक्त करताना दिसतात. या अभिनेते रणधीर कपूर यांच्या मुली आहेत. अभिनय क्षेत्रातील एका नावाजलेल्या आणि लोकप्रिय कुटुंबाचे सदस्य असून ही रणधीर कपूर यांना दोन मुलींना सांभाळणे कठीण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. आज काल कलाकारांना पैसे कमावणे फार सोपे आहे. पण त्या काळात असं नव्हतं, असं म्हणत रणधीर कपूर म्हणाले, “माझ्या दोन मुली आहेत. करीना आणि करिश्माची ट्यूशनची फी, विजेचं बिल आणि पत्नीच्या सगळ्या गोष्टींचा खर्च करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते.”

आणखी वाचा : ‘याला म्हणतात अश्लीलता…’, निकसोबतच्या त्या फोटोमुळे प्रियांका झाली ट्रोल

ते पुढे म्हणाले, ‘आज काल कलाकार किती पैसे कमवतात. आम्ही पैसे कमवण्यासाठी खरंच खूप मेहनत करायचो. माझ्या मुलींची ट्यूशनची फी, माझं विजेच बिल, पत्नी बबीताचा खर्च, माझी स्कॉच आणि इतर बिल भरण्यासाठी अभिनयातून मिळालेले पैसे पुरेसे नव्हते.”

आणखी वाचा : ‘कोरिओग्राफरने २० मॉडेल समोर मला…’, मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी क्रितीने केला खुलासा

रणधीर पुढे म्हणाले, “आज काल कलाकार त्यांना काय करायचं आहे ते ठरवतात. ते वर्षात फक्त एक चित्रपट करतात. कारण त्यांना कार्यक्रम, कोणत्या कंपनीची एंडोर्समेंट आणि इतर पद्धतीने पैसे कमवतात. आम्ही संपूर्ण वर्षात फक्त एक चित्रपट करू शकत नव्हतो. जर आम्ही काम केलं नसतं तर आमच्याकडे घर चालवायला आणि आमची बिल भरण्यासाठी पैसे राहिले नसते.”