विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत अभिनेत्री कंगना राणावतने स्वत:ला झोकून दिले आहे. चित्रपटात सैफ अली खान आणि शाहिद कपूर हे अभिनेते तिचे सह-कलाकार म्हणून दिसणार आहेत. घोडेस्वारी आणि बॅले नृत्यप्रकारासाठी कठोर परिश्रम घेत असलेल्या कंगनाने ‘रंगून’साठीची तयारी ही शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. घोडेस्वारीचा सराव, बॅले नृत्याचे प्रशिक्षण आणि चित्रपटासाठी कराव्या लागणाऱ्या अन्य गोष्टींमुळे हाडे खिळखिळी झाल्याची भावना तिने व्यक्त केली. राष्ट्रीय पुरस्कार परत करून विरोध दर्शविणाऱ्या चित्रपटकर्त्यांनी त्यांच्या मार्गाने त्यांचे म्हणणे मांडेल असून, ते ठीकच असल्याचे म्हणत कंगनाने त्यांच्या कृतीचे समर्थन केले.

Story img Loader