कॉमेडी शुक्रवार! विनोदवीर कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ टीव्हीवरील या प्रसिद्ध शोमध्ये सहभागी होण्यासाठी राणी मुखर्जी आणि संजय लीला भन्साळी ‘कॉमेडी नाईट…’च्या सेटवर दाखल होणार आहेत. राणी ‘मर्दानी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, तर संजय लीला भन्साळी ‘मेरी कोम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या शोमध्ये सहभागी होत आहेत. ‘ब्लॅक’सारखा उत्कृष्ट चित्रपट देणारी ही दिग्दर्शक आणि अभिनेत्रीची जोडी ‘कॉमेडी नाईट्स…’च्या वेगवेगळ्या भागात दिसणार असून, त्यासाठीच्या चित्रीकरणासाठी शुक्रवारी ते शोच्या सेटवर दाखल होणार असल्याचे समजते. दोन्ही भागांचे चित्रीकरणदेखील वेगवेगळ्या वेळेला होणार आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि सलमान खानसारख्या दिग्गजांनी उपस्थिती लावलेल्या या शोमध्ये राणी आणि भन्साळी पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. राणीचा ‘मर्दानी’ आणि भन्साळी सह-निर्माता असलेल्या ‘मेरी कोम’ चित्रपटात ‘स्त्रीशक्ती’ हा समान दुवा आहे. ‘मर्दानी’ चित्रपटात राणी एका कर्तव्य कठोर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, तर ‘मेरी कोम’ चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियांका चोप्रा ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक पटकावणारी महिला मुष्ठियोद्धा एम. सी. मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये राणी मुखर्जी आणि संजय लीला भन्साळी
कॉमेडी शुक्रवार! विनोदवीर कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' टीव्हीवरील या प्रसिद्ध शोमध्ये सहभागी होण्यासाठी राणी मुखर्जी आणि संजय लीला भन्साळी...
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-08-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukerji and her black director bhansali on comedy nights with kapil