बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीनं तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही ती आपल्या अभिनयाच्या बाबतीत टक्कर देताना दिसते. राणी मुखर्जीचा जन्म २१ मार्च १९७८ मध्ये मुंबईत झाला होता. पण तिच्या जन्माच्या वेळी असं काही घडलं की तिच्या आईनं ‘ही माझी मुलगीच नाही’ असं डॉक्टरांना सांगितलं होतं. या घटनेचा किस्सा राणी मुखर्जीनं तिच्या एका जुन्या मुलाखतीत शेअर केला होता.

काही वर्षांपूर्वी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीत राणी मुखर्जीनं सांगितलं, ‘जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळी मी एका पंजाबी कुंटुबाकडे सापडले होते आणि माझ्या आई- वडिलांसोबत त्यांची मुलगी होती. माझ्या आईनं जेव्हा त्या मुलीला पाहिलं तेव्हा ती डॉक्टरांना म्हणाली, ही माझी मुलगीच नाही, हिचे डोळे तपकिरी नाहीयेत. जा अगोदर माझ्या मुलीला शोधून आणा.’

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

आणखी वाचा- राणी- अभिषेकच्या ब्रेकअपचं कारण ठरला बिग बींसोबतचा ‘तो’ किसिंग सीन? वाचा नेमकं काय घडलं

राणी पुढे म्हणाली, ‘मी जन्माच्या वेळीच त्या पंजाबी कुटुंबाच्या मुलीसोबत बदलले गेले होते आणि हे माझ्या आईला त्याचवेळी समजलं होतं की तिच्याकडे असलेली मुलगी तिची मुलगी नाहीये. त्यामुळे तिने हॉस्पिटलमध्ये शोधाशोध करायला सुरूवात केली होती. बराच शोध घेतल्यानंतर मी त्यांना एका पंजाबी कुटुंबाकडे सापडले. त्यावरुन ते आजही मला चिडवतात. तू खरंच एका पंजाबी कुटुंबातील आहेस. पण चुकून आमच्या कुटुंबात आली आहेस असं ते सर्वजण मस्करीत म्हणतात.’

आणखी वाचा- “आम्ही तिला नेहमी…” कपड्यांमुळे ट्रोल होणाऱ्या अनन्याबद्दल वडील चंकी पांडे यांची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान राणी मुखर्जी ही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी यांची मुलगी आहे. तिच्या मोठ्या भावाचं नाव राजा मुखर्जी असं आहे. तसेच ती अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची चुलत बहीण आहे. राणी मुखर्जीनं निर्माता आदित्य चोप्राशी लग्न केलं होतं या दोघांना अदिरा नावाची एक मुलगी देखील आहे.

Story img Loader