बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने गोड बातमी दिली आहे. राणी मुखर्जीला कन्यारत्नाचा लाभ झाला असून, राणी आणि आदित्य चोप्राने आपल्या चिमुकलीचे ‘अधिरा’ असे नामकरण केले आहे. राणी आणि आदित्यने आपल्या नावातील अद्याक्षरांच्या एकत्रिकरणातून ‘अधिरा’ हे नाव ठेवले आहे.
दरम्यान, आपल्या शुभचिंतकांचे आणि चाहत्यांचे राणीने आभार व्यक्त केले आहेत. आदित्य आणि माझ्या आयुष्यात देवाने आजवरचे सर्वात मोठं गिफ्ट आम्हाला दिलं असून, आशिर्वाद देणाऱया सर्व चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यातील या नव्या वळणाची आम्ही आनंदाने सुरूवात करत आहोत, असे राणीने म्हटलं आहे.
राणी आणि आदित्य एप्रिल २०१४ मध्ये इटलीत लग्नबंधनात अडकले. त्याआधी दोघेही बरीचं वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. आदित्यचा भाऊ उदय चोप्रा, अभिनेत्री परिणीती चोप्रा, अभिनेता रितेश देशमुख यांनीही राणी आणि आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader