अलिकडेच इटली येथे गुप्तपणे चित्रपटकर्ता आदित्य चोप्राशी लग्न केलेली नववधू राणी मुखर्जीने कामाला सुरुवात केली आहे. प्रदीप सरकारच्या मर्दानी या आगामी चित्रपटात अभिनय करत असलेली राणी चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी लग्नानंतर कामावर रुजू झाली आहे. चित्रपटात महिला पोलिसाची भूमिका साकारत असलेली राणी मुखर्जी लग्नानंतर या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर नजरेस पडली. इटलीवरून परतल्यानंतर राणी आणि आदित्यने मित्रपरिवार आणि चित्रपटसृष्टीतील ओळखीच्या लोकांसाठी आपल्या मुंबईतील निवासस्थानी रविवारी (४ मे) रिसेप्शनचे आयोजन केले होते. यावेळी चित्रपटक्षेत्रातील करण जोहर, अनुपम खेर आणि त्यांची पत्नी किरण याशिवाय राणीची जवळची मैत्रीण वैभवी मर्चंट अशी अनेक मोठी मंडळी उपस्थित होती. मर्दानी चित्रपटातील आपल्या भूमिकेची तयारी करण्यासाठी म्हणून अलिकडेच राणी मुखर्जीने मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखांची भेट घेतली होती.
राणी मुखर्जी-चोप्रा लागली कामाला!
अलिकडेच इटली येथे गुप्तपणे चित्रपटकर्ता आदित्य चोप्राशी लग्न केलेली नववधू राणी मुखर्जीने कामाला सुरुवात केली आहे.

First published on: 28-05-2014 at 04:24 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodराणी मुखर्जीहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukerji is back to work starts shooting for mardaani