चित्रपटकर्ता आदित्य चोप्राशी विवाह केलेली बॉलीवूड अभिनेत्री राणी लग्नानंतर आपले आडनाव मुखर्जी ऐवजी चोप्रा करुन घेण्यात उत्सुक नाही.
मला माझे नाव आवडते आणि माझे चाहते मला राणी मुखर्जी याच नावाने ओळखतात त्यामुळे आडनावात बदल करण्यास उत्सुक नसल्याचे राणी मुखर्जी म्हणाली. आपली मूळ ओळख कधीच बदलत नाही ती शेवटपर्यंत राहते त्यामुळे आडनावात बदल करण्यास मला रस नाही. असेही राणी म्हणली.
तसेच वैयक्तीक पातळीवर जेव्हा माझ्या मुलांना शाळेत प्रवेश करण्याची वेळ येईल त्यावेळी आडनावात बदल होईल परंतु, माझ्या चाहत्यांसाठी माझे राणी मुखर्जी हेच नाव राहील असेही ती म्हणाली.
त्याचबरोबर इटलीत गुपचुप विवाह केल्यामागचे कारण विचारले असता, त्यामागे माझा काही हात नाही. आदित्यने मला आपण इटलीत लग्न करुया असे म्हटले आणि मी तयार झाले. आदित्यने संपूर्ण विचार करुन वैयक्तीक पातळीवर लग्न करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरासमोर येण्यावर मेहनत घेण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यावर आदित्यचा नेहमी भर असतो. असेही राणी मुखर्जी म्हणाली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा