बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तीन वेळ राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक अदित्य चोप्रा याच्याशी येत्या फेब्रुवारीमध्ये राणी विवाहबंधनात अडकत असल्याचे वृत्त आहे.
एका महत्त्वाच्य़ा दैनिकातील वृत्तानुसार राणी आणि अदित्य चोप्रा १० फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. हा विवाह सोहळा जोधपूर स्थित प्रसिध्द उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडणार आहे.  
गेल्या वर्षीच राणी व अदित्य चोप्रा यांचा विवाह पारपडणार होता. मात्र, अदित्य चोप्रा यांचे वडिल चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचे ऑक्टोबर २०१२ मध्ये निधन झाल्यामुळे अदित्य चोप्रा यांनी लग्नसोहळा पुढे ढकलला होता.
पारंपारिक पंजाबी पध्दतीने राणी व अदित्य चोप्रा यांचा लग्न सोहळा पारपडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या राणी तिच्या आगामी ‘मर्दानी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. ‘मर्दानी’ चित्रपटामध्ये राणीने  पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.   

Story img Loader