आदित्य चोप्राचा बेफिक्रे चित्रपट सध्या सर्वांचेच लक्ष वेधतोय. रणवीर-वाणीचा लिपलॉक पोस्टर तर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. आदित्य चोप्रा आता पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसला असून या चित्रपटात त्याचा जवळचा मित्र आणि बॉलीवूड बादशहा शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. पण, या चित्रपटात आता शाहरुखलाही मागे टाकणारं कोणीतरी येणार आहे.
सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार आदित्यची पत्नी आणि अभिनेत्री राणी मुखर्जी आणि त्याची आई पॅमेला चोप्रा या दोघीदेखील बेफीक्रेमध्ये झळकतील. इतकेच नाही तर त्याची चिमुकली मुलगी आदिरा हीसुद्धा या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या तिघींचीही चित्रपटातील दृश्य चित्रीत करून झाल्याचे कळते.
आदित्य आणि राणीला ९ डिसेंबर २०१५ रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला. तिचे नाव यांनी आदिरा असे ठेवलेय. आदिराच्या जन्मापासून अद्यापपर्यंत तिची एकही झलक माध्यमांना दिसलेली नाही. पण, या चित्रपटाद्वारे राणीच्या सर्व चाहत्यांना तिच्या लेकीची झलक पाहण्याची संधी मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा