गुन्हेगारांशी दोन हात करणारा नायकऐवजी नायिका दाखविण्याचा वेगळा प्रयत्न यशराज फिल्म्सने ‘मर्दानी’ या चित्रपटातून केला. चित्रपटात अफलातून आणि तडफदार ‘मर्दानी’ साकारलेल्या राणीने प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांचेच लक्ष्य वेधले. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १५ कोटींची कमाई केली आहे. ‘मर्दानी’ ने पहिल्या तीन दिवसांमध्ये १४.४६ कोटींची कमाई केली होती. इतकेच नाही तर बॉलीवूड सेलिब्रेटींनीही ‘मदार्नी’ चित्रपटाची प्रशंसा केलीयं.
करण जोहरः राणी मुखर्जी अप्रतिम, #Mardani
शिल्पा शेट्टीः नुकताच ‘मर्दानी’ चित्रपट पाहिला. एक यशस्वी आणि संदेश देणारा चित्रपट. सर्वांनीच चांगले काम केले आहे आणि राणी तर अप्रतिमचं.
अमिषा पटेलः रात्री ‘मर्दानी’ चित्रपट पाहिला. सर्वांनीच बघावा असा चित्रपट आहे.

Story img Loader