अभिनेत्री रानी मुखर्जी यशराज फिल्मच्या माध्यमातून ‘मर्दानी’ या चित्रपटात महिला पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेजगतात रानी मुखर्जी पहिल्यांदा पोलिस अधिकारीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक प्रदीप सरकार करणार आहेत. या चित्रपटाचा विषय रानी आणि प्रदीप या दोघांसाठीही नवीनच आहे. याआधी प्रदीप सरकार यांनी ‘लागा चुनरी में दाग’ आणि ‘लफंग परिंदे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर रानी मखर्जीने यशराज फिल्मच्या बॅनरखाली शेवटचा सिनेमा ‘दिल बोले हडीप्पा’ यात काम केले होते. हा सिनेमा पाहिजेतसे यश मात्र मिळवू शकला नव्हता. ‘मर्दानी’ या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.   

Story img Loader