बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून अभिनेत्री राणी मुखर्जी ओळखली जाते. आज राणी मुखर्जीचा ४४ वा वाढदिवस. राणीनं तिच्या करिअरमध्ये एक पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण या चित्रपटांसोबतच राणीच्या खासगी आयुष्याचीही तेवढीच चर्चा सोशल मीडियावर झाली. एकेकाळी राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती. अर्थात काही काळानं त्यांचं ब्रेकअप झालं आणि या दोघांमधील संबंध एवढे बिघडले की बच्चन कुटुंबीयांनी राणीला अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नव्हतं. जाणून घेऊयात नेमकं काय कारण होतं की या दोघांचं ब्रेकअप झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. पण नंतर करिश्माची आई बबिता कपूर आणि बच्चन कुटुंबीय यांच्यात काही कारणानं दुरावा आला आणि तो नंतर वाढत गेला. अखेर करिश्मा आणि अभिषेक यांचा ठरलेलं लग्न मोडलं. त्यानंतर अभिषेक आणि राणी यांच्यातील जवळीक हळूहळू वाढू लागली. राणीचं अभिषेकवर खूप प्रेम होतं असंही म्हटलं जातं.

आणखी वाचा- “आम्ही तिला नेहमी…” कपड्यांमुळे ट्रोल होणाऱ्या अनन्याबद्दल वडील चंकी पांडे यांची प्रतिक्रिया चर्चेत

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांसोबत ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’ सारख्या धमाकेदार चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या चित्रपटांदरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली. एवढंच नाही तर दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना भेटल्याचीही चर्चा होती. बऱ्याच पार्टी आणि कार्यक्रमात अभिषेक आणि राणी एकत्र दिसायचे. जया बच्चन स्वतः बंगाली असल्यानं त्यांची सून देखील बंगाली असावी असं त्यांना वाटायचं आणि त्यामुळे त्यांना राणी मुखर्जी देखील आवडली होती.

आणखी वाचा- The Kashmir Files वर अखेर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला “जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार…”

अभिषेकसाठी राणी मुखर्जीला जया बच्चन यांचा होकार होता. पण नंतर जया बच्चन यांनीच राणी आणि अभिषेक यांच्यातलं नातं संपवलं असं बोललं जातं. काही रिपोर्ट्सनुसार राणी मुखर्जीवर जया बच्चन नाराज होत्या. याचं कारण म्हणजे त्यावेळी संजय लीला भन्साळी यांचा हिट चित्रपट ब्लॅकमध्ये राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात राणी आणि अमिताभ यांचा एक किसिंग सीन होता. ज्यावर जया बच्चन यांनी आक्षेप घेतला होता. आपल्या होणाऱ्या सूनेनं अशाप्रकारचा सीन सासऱ्यासोबत चित्रत करणं जया यांना मान्य नव्हतं. मात्र राणीनं या सीनला होकार दिला होता. याच कारणाने राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukhertji birthday know about the reason of her breakup with abhishek bachchan mrj