रानू मंडल (Ranu Mondal) हे नाव आता कोणासाठी नवीन नाही. एकदा तिचा रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यामुळे ती एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झाली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला हिमेश रेशमियाने चित्रपटात गाण्याची संधीही दिली. त्यानंतर सध्या तिचा आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रानू मंडल आणि सलमान खानचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत रानू मंडल आणि सलमान १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चलती का नाम गाडी या चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘हाल कैसा है जनाब का’ (Haal Kaisa Hai Janab Ka) हे गाणं गात असल्याचे दिसत आहे. त्या दोघांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “हो मी व्हर्जिन…”, सलमान खानच्या उत्तराने चाहत्यांना बसला होता आश्चर्याचा धक्का

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?

पण तुम्हाला हा व्हिडीओ खरा असल्याचे वाटत असेल तर हा व्हिडीओ दोघांचे वेगवेगळे व्हिडीओ एडिट करून बनवला आहे. सोशल मीडियावर अनेकदा मीम्स आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या या वेगवेगळ्या व्हिडीओला असे एडिट केले आहे की हे दोघं खरचं ‘हाल कैसा है जनाब का’ हे गाणं गात आहेत असं वाटतं.

आणखी वाचा : ‘शेर शिवराज’चा जगभर डंका, भारतात १००० तर परदेशात १०० शोज हाऊसफुल

दरम्यान, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी ‘हाल कैसा है जनाब का’ हे मुळ गाणं गायलं आहे. तर एसडी बर्मन यांनी गाण्याला संगीतबद्ध केले होते. हे गाणं त्या काळातील सुपरहिट गाणं आहे. या गाण्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही.