रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर राणू मंडल रातोरात स्टार झाली होती. एवढंच नाही तर गायक हिमेश रेशमियानेही तिला आपल्या अल्बम सॉन्गसाठी आवाज देण्याची संधी दिली होती. राणू मंडल एकीकडे प्रसिद्ध मिळवत होती तर दुसरीकडे स्वतःच्या वाईट वागणुकीमुळे सोशल मीडियावर ट्रोलही होत होतं. आताही राणू मंडल नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तिने दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा अपमान केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राणू मंडल म्हणतेय, “हे जे गाणं मी गात आहे ते कोणत्याही लता फताचं नाही. हे लताजींचं गाणं नाही. मी हे गायले, त्याचा आवाजही चांगला आहे आणि चांगला होता.” त्यानंतर ती ‘है अगर दुश्मन’ गाणं गाऊ लागते. हे गाणं १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम किसी से कम नहीं’ चित्रपटातील आहेत. हे गाणं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलं होतं.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक राणू मंडलवर भडकले आहेत. दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा अपमान केल्याबद्दल लोकंनी तिच्यावर राग काढायला सुरुवात केली आहे. काहींनी तिला, “लता मंगेशकर यांचा मान ठेवायला शिक.” असा सल्ला दिला आहे. तर काहींनी, “त्यांचं नाव व्यवस्थित घे” असंही सांगितलं आहे.
आणखी वाचा- कंगनाच्या ‘लॉकअप २’मध्ये जाण्याबद्दल उर्फी जावेदने सोडलं मौन; म्हणाली, “माझ्याशिवाय तुमचं…”
दरम्यान २०१९ मध्ये राणू मंडलचा पहिल्यांदा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. पण त्यानंतर तिचा चाहत्यांबरोबर असभ्य वर्तणूक करत असताना व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिच्यावर टीका झाली होती. त्यावेळी सेल्फी घेत असलेल्या चाहतीला राणूने फटकारलं होतं.