सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा ‘कच्चा बादाम’ हे गाणं झालं होतं. खरतरं हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलं आहे. आता सोशल मीडियावर सेन्सेशन ठरलेल्या रानू मंडल यांनी हेच गाणं एक वेगळ्या अंदाजात प्रदर्शित केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या ट्विटरवर रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रानू मंडल कच्चा बदाम गाण्याचं नवीन व्हर्जन गाताना दिसतं आहे. विशेष म्हणजे रानू मंडल या गाण्यामध्ये नवरीच्या लुकमध्ये दिसत आहे. त्यांनी लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसे दागिने घातले आहेत. सध्या हा १४ सेकंदांचा रानू मंडलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे म्हणाले, “Jealous…”
आणखी वाचा : आलियाच्या मंगळसूत्रापासून प्रत्येक दागिन्यात दडलयं ‘हे’ सीक्रेट, जाणून घ्या काय आहे अर्थ
दरम्यान, याआधी रानू यांनी सहदेवचं ‘बचपन का प्यार’ हे गाणं पण गायलं होतं. त्यावेळीही त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांनी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी रानू मंडल या स्वत:च्या चपलेत अडकून पडता पडता वाचल्या.