Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया ( Ranveer Allahbadia ) हा प्रसिद्ध युट्यूबर मोठ्या चर्चेत आला आहे. सामान्यत: रणवीर अलाहाबादिया हा त्याच्या पॉडकास्टसाठी ओळखला जातो. बीअर बायसेप्स (Beer Biceps) या त्याच्या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर तसेच अनेकविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीबरोंबर तो चर्चा करताना दिसतो. त्याने आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे. मात्र त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण तो व्हिडीओ हटवण्यासंबंधी आता NHRC ने युट्यूबला नोटीस पाठवली आहे.

NHRC ने काय म्हटलं आहे?

NHRC ने अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठवलेल्या नोटिशीमुळे रणवीरच्या अडचणींत भर पडली आहे. युट्यूबला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पत्र लिहिलं आहे आणि हा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रणवीर ( Ranveer Allahbadia ) अडचणींत सापडला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले, “मला पश्चाताप झाला नाही”
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती

रणवीरने नेमकं काय म्हटलं होतं?

इंडिया गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहे रणवीर अलाहाबादिया?

रणवीर अलाहाबादिया ( Ranveer Allahbadia ) हा प्रसिद्ध युट्यूबर असून तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शो सर्वाधिक चर्चेत असते. अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. त्याने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे. रणवीरने शाळेत असतानाच युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तो एकूण तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ranveer Allahabadia net worth
वादग्रस्त टिप्पणीवरून झालेल्या गोंधळानंतर आणि त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनंतर, रणवीरने एक व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

रणवीर अलाहाबादियाच्या ( Ranveer Allahbadia ) या आक्षेपार्ह विधानाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे.”

Story img Loader