Ranveer Allahbadia and Samay Raina Controversy: गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेले रणवीर अलाहबादिया-समय रैना प्रकरण आता जगभरात पोहचले असून, त्याची सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळात आहे. अशात आपल्या निर्भय विनोदासाठी ओळखले जाणारे भारतीय-अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियन आकाश सिंग यांनी विनोदी कलाकार बीअर बायसेप्स (रणवीर अलाहाबादिया) आणि समय रैना यांना पाठिंबा देत, याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर या प्रकरणी वाढत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आकाश सिंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा या विनोदी कलाकारांच्या विनोदांना आणि भारतातील सर्व स्टँड-अप कॉमिक्सना पाठिंबा आहे.

गॅसलिट स्टँड-अप स्पेशल आणि फ्लॅगरंट या मालिकेतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आलेले विनोदी कलाकार आकाश सिंग यांनी रणवीर आणि समयच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली आहे.

लोक त्याच्या मागे का लागले…

रणवीर आणि समयचे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लाखो युजर्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. यानंतर आकाश सिंग यांनी, एक्सवर एक पोस्ट करत रणवीर आलाहबादीयाला पाठिंबा दर्शवला होता. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते की, “बीअर बायसेप (रणवीर) हा त्यांच्या कुटुंबाचा सदस्य आहे. लोक त्याच्या मागे का लागले आहेत, हे मला माहित नाही आणि मला त्याची पर्वाही नाही. मी त्याच्यासोबत आहे.”

आकाश सिंग यांच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट करत त्याला सवाल केला की, “जर तुम्ही ठाम असाल तर, ट्विटरवर फक्त असे म्हणा की, तुम्ही त्याच्या विनोदांना पाठिंबा देता.” यावर आकाश सिंग म्हणाले, “हे स्पष्ट आहे, मी समय आणि रणवीरसह भारतातील प्रत्येक विनोदी कलाकाराच्या विनोदांना पाठिंबा देतो. मला पूर्णपणे निरुपद्रवी विनोदामुळे नाराज झालेल्या मूर्खांना यातून बाहेर काढायचे आहे.”

काय आहे वाद?

इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमात रणवीर अलाहाबादिया याने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की त्यांच्याबरोबर सहभागी होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer allahabadia samay raina controversy global supportakaash singh indian american stand up comedian aam