Ranveer Allahbadia : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एक आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. तसेच त्याची पोलिसांनी चौकशी देखील केली. यानंतर अखेर रणवीर अलाहबादियाने एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे.‘इंडिया गॉट लेटेंट’ मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे रणवीर अलाहबादिया वादात सापडला आहे.

रणवीर अलाहबादिया हा प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर आहे. मात्र, कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे रणवीर अल्लाबदियाने त्याच्या चॅनलवरील २ दशलक्षाहून अधिक युजर्स एका दिवसात गमावले आहेत. रणवीर अलाहबादिया हा भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या युटयुबर्सपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार २०२४ पर्यंत रणवीर इलाहाबादियाची एकूण संपत्ती अंदाजे अंदाजे ६० कोटी रुपये (७ दशलक्ष डॉलर) एवढी असल्याचं सांगितलं जातं. तसेच यूट्यूब आणि व्यावसायिक उपक्रमांमधून त्याचे मासिक उत्पन्न सुमारे ३५ लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं. यासंदर्भातील वृत्त ‘वन इंडिया’ने दिलं आहे.

रणवीर अलाहबादियाने २०१४ मध्ये त्याचा यूट्यूबचा प्रवास ‘बिअर बायसेप्स’वरील फिटनेस सामग्रीसह सुरू केला. तेव्हापासून तो आरोग्य आणि मल्टी-प्लॅटफॉर्म ब्रँड बनला आहे. तो आता १२ दशलक्षाहून अधिक युजर्स असलेले यूट्यूब चॅनेल चालवतो. दरम्यान, या वादानंतर रणवीरने आपली चूक मान्य करत सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली. “इंडियाज गॉट लेटेंटवर मी जे बोललो ते मी बोलायला नको होतं. मला माफ करा”, असं त्याने म्हटलं आहे.

‘बिअर बायसेप्स’चे सबस्क्रायबर्स झाले कमी

रणवीर अलाहाबादियाच्या बीअर बायसेप्स या युट्यूब चॅनेलचे ३१ जानेवारी २०२५ ला १०.५ मिलियन सबस्क्रायबर्स होते. तर १० फेब्रुवारीला हा आकडा ८.3 मिलियन इतका झाला आहे. जवळजवळ दोन मिलियन लोकांनी त्याच्या चॅनेलचे सबस्क्रिप्शन काढले आहे. इंडिया गॉट लेटेंटमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा रणवीर अलाहबादियाला चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader