नवविवाहित जोडपं दीपिका आणि रणवीर सिंग दोघांनीही बॉलिवूडसाठी १ डिसेंबर रोजी जंगी पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीसाठी जवळपास सर्व बॉलिवूड उपस्थित राहणार आहे. जोडप्यानं स्वत: सगळ्यांना विशेष आमंत्रण पाठवलं आहे. मात्र रिसेप्शन पार्टीसाठी दीपिकानं कतरिनाला बोलावणं जाणीवपूर्वक टाळल्याचं म्हटलं जात आहे. पण दीपिकाकडून जरी कतरिनाला आमंत्रण नसलं तरी रणवीरकडून मात्र कॅटला खास आमंत्रण गेल्याचं समजत आहे.

दीपिका आणि कतरिनामधला वाद हा खूपच जुना आहे. दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरनं कतरिनासाठी दीपिकाला सोडलं अशा तेव्हा चर्चा होत्या. तेव्हापासून या दोघींमधला विस्तव काही केल्या जात नाही. अशातच काही दिवसांपूर्वी कतरिनाला लग्नाला बोलावणार का असा प्रश्न दीपिकाला विचारला होता, यावर तिनं साफ नकार दिला होता. यावरून या दोघींमध्ये अजुनही कटुता असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

पण, दीपिकानं पार्टीचं आमंत्रण जरी कतरिनाला दिलं नसलं तरी रणवीरनं मात्र मैत्री जपत कतरिनाला पार्टीसाठी उपस्थित राहण्याचा आग्रह केला आहे. कतरिना सध्या ‘भारत’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. जर चित्रिकरणातून वेळ मिळाला तर सहकलाकार सलमानसोबत ती १ डिसेंबरला होणाऱ्या पार्टीत उपस्थित राहिल असं म्हटलं जात आहे.