रणवीर सिंग, परिणीती चोप्रा आणि अली झफर यांच्या ‘किल दिल’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचा अनुभव आपल्यासाठी वास्तविक असल्याचे रणवीरचे म्हणणे आहे.
गेल्याच आठवड्यात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून रणवीर आणि परिणीतीने याबाबत ट्विट केले आहे. ‘साथिया’ चित्रपटाचा दिग्दर्शक शाद अलीने किल दिलचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात गोविंदासोबत रणवीर सिंग नृत्य करताना दिसणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

Story img Loader