सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेला ‘राम लखन’ या चित्रपटाचा लवकरचं रिमेक येणार आहे. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी साकारलेल्या राम-लखन या भूमिका आता कोण साकारणार याविषयी बॉलीवूडमध्ये चर्चा रंगली होती. अखेर, याविषयी आता खुलासा झाल्याचे कळते.
वरूण धवन, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची नावे लखनच्या भूमिकेसाठी आणि रणबीर कपूर, हृतिक रोशन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची नावे रामच्या भूमिकेसाठी चर्चेत होती. पण यात बाजी मारली ती शाहीद कपूर आणि रणवीर सिंग या अभिनेत्यांनी. रामच्या भूमिकेत शाहीद कपूर आणि लखनच्या भूमिकेत रणवीर सिंग रिमेकमध्ये दिसणार आहे.
‘राम लखन’च्या रिमेकचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार असून लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. सध्या रणवीर सिंग हा आदित्य चोप्राच्या ‘बेफिक्रे’ मध्ये वाणी कपूर सोबत शूटिंग करत आहे. तर शाहीद हा उडता पंजाबसाठी करीना कपूर खान आणि आलिया भट्टसोबत प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा