२०१८ या वर्षात दमदार चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता आगामी प्रोजेक्ट्समध्ये रमले आहेत. जाहिरातींमध्ये दिसलेली ही जोडी आता रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘गली बॉय’ हा रणवीर- आलियाचा आगामी चित्रपट असून त्याचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट एक म्युझिकल ड्रामा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अपना टाइम आएगा’, असं कॅप्शन देत रणवीर आणि आलियाने सोशल मीडियावर हा पोस्टर शेअर केला. या पोस्टरमध्ये रणवीरची स्पष्ट झलक दिसत नसून हूडी घातलेला एक व्यक्ती पाहायला मिळत आहे. रणवीर आणि आलिया या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही.

वाचा : ‘चुकांमधून धडा घेणार’; आमिरचा नववर्षाचा संकल्प

चित्रपटात रणवीर आणि आलियासोबत कल्की कोचलिनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ती एका रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीर सिंगने याआधीही झोया अख्तरसोबत ‘दिल धडकने दो’ या सिनेमात काम केले होते. पण, झोयाच्या दिग्दर्शनात काम करण्याची आलियाची ही पहिलीच वेळ आहे. ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.