बॉलिवूडमध्ये लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह. दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि वेळोवेळी चाहत्यांना त्यांच्या कामा बाबत अपडेट देत असतात. या जोडीने शनिवारी बॅडमिंटन प्लेयर पी.व्ही. सिंधू ची भेट घेतली. त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीरने या खास क्षणाचा फोटो त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात रणवीरने केस बांधून गॉगल आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तर दीपिकाने सुद्धा पांढऱ्या रंगाचा टॉप आणि सोनेरी रंगाचे कानातले आणि पी.व्ही.सिंधूने देखील पांढऱ्या रंगाचा वन-पीस परिधान केल्याचे दिसून आले आहे. हा फोटो शेअर करत रणवीरने छान असे कॅप्शन दिले आहे. तसंच पी.व्ही.सिंधूने देखील हा फोटो शेअर करत, “आमच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहुन तुम्हाला कळात असेलच की आम्ही खुप एजॉय केलं.”  असे कॅप्शन दिले आहे.

रणवीर, दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पोस्टवर नेटकरी फिदा झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शनिवारी संध्याकाळी एका रेस्टॉरंट बाहेर या तिघांना स्पॉट करण्यात आले. यावेळस एका फोटोग्राफरला दीपिकाचा एकटीचा फोटो काढायचा होता, त्यावेळेस दीपिका म्हणाली, “माझा सोलो फोटो नको पी.व्ही.सिंधूचा सोलो फोटो काढा.” पी.व्ही.सिंधू सलग दोनवेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. दीपिका आणि रणवीरच्या आगामी चित्रपटा बाबत बोलायचे झाले तर ते लवकरच ८३ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. तसंच रणवीर लवकरच आपले छोट्या पडद्यावर सूत्रसंचालक म्हणून पदार्पण करणार आहे.