‘हम दिल दे चुके सनम’ प्रदर्शित होण्यापूर्वी देखिल साधारण आशीच अवस्था होती. अशी म्हणजे, ‘राम लीला’च्या प्रदर्शनाचा ‘ढोल बाजे’ सुरू आहे तशी. १९९९ च्या जून महिन्यात ‘हम दिल दे चूके सनम’ झळकला, त्यातून काय उत्तरे मिळाली.
ऐश्वर्या राय फक्त मॉडेल अथवा प्लॅस्टीकची बाहुली नाही, तर आपल्याकडे सौंदर्यासह अभिनय आणि नृत्य हे गुणदेखिल आहेत हे तिने ‘नंदीनी’च्या भूमिकेतून दाखवून दिले.
चित्रपट घडता घडता सलमान खान प्रेमाचा अभिनय करता करता खरोखरच ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. आता ‘राम लीला’ झळकत असताना देखिल काय उत्तरे मिळत आहेत?
दीपिका पदुकोण केवळ फॅशनेबल आभिनेत्री नव्हे तर तिच्याकडे मोहकता, सुंदरता यासह थोडासा तिखटपणाही असून, त्यात नृत्याची भर पडल्याने तिचा अभिनय उजळला.
‘राम लीला’ चित्रीकरणाच्या प्रवासात रणवीर सिंग कळत-नकळतपणे दीपिकाच्या जवळ गेला. हा सहवासाचा आणि तिच्या स्वभावाचा परिणाम असेलही. ‘जोडा’ दिसतोयही छान. त्याची आक्रमकता आणि तिची मोहकता असा सूर जुळलाय म्हणा.
‘राम लीला’ हा ‘हम दिल दे चुके सनम’चा पुढचा भाग आहे असे सवंग विधान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तरी करणार नाही. पण तेव्हा जसे घडले, तसेच आता देखिल घडतय या तद्दन फिल्मी योगायोगाला काय बरे म्हणावे?
तेव्हा सिनेमा झळकला, उतरला पण सल्लू एशचा होवू न शकला. निदान आता तसे होवू नये. अन्यथा दीपिका रणबीर कपूरची होवू शकली नाही तशीच रणवीर सिंगचीही झाली नाही असे व्हायचे. या कथेचा शेवट तरी वेगळा व्हावा.

Story img Loader