रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये रणवीर आणि वाणीचा ‘लिप लॉक’ दाखवण्यात आलेला आहे. ‘बेफिक्रे’ चित्रपटाद्वारे या दोघांची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. रणवीरने हे पोस्टर ट्विट केले आहे. तसेच, त्याने एका ट्विट म्हटलेय की, प्रेम करण्याची हिम्मत करणा-यांपैकी तुम्ही जर असाल तर तुम्हाला हे नक्कीच आवडेल. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘ब्रेफिक्रे’ चित्रपट ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader