बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि अर्जून कपूर यांना त्याच्या गुंडेमधील भूमिका बदलून हव्या होत्या. गुंडे चित्रपटातील दिले्ल्या भूमिका दोघांमध्येच बदलण्याची मागणी सुरूवातीला रणवीर आणि अर्जूनला यांनी केली होती.
गुंडे ही बाला आणि विक्रम या दोन मित्राची कथा असून, या दोघांच्या भूमिका अनुक्रमे अर्जून आणि रणवीर यांनी साकारल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दोघांना या भूमिकांबद्दल एकत्र माहिती दिली असता दोघांनी विचारणा केलेल्या भूमिके ऐवजी दुसरी भूमिका करायला आवडेल असे सांगितले होते.
बालाची भूमिका काहीशी बडबडी आहे तर विक्रम काहीसा शांत मात्र रागीट स्वभावाचा आहे. अलीला माहित होते विक्रमच्या भूमिकेसाठी रणवीर व बालाच्या भूमिकेसाठी अर्जून योग्य आहेत. शेवटी अली अब्बास जफर याला दोघांना त्यांच्या भूमिकांचे महत्त्व पटवून देण्यात यश मिळाले. दोघांना त्यांच्या भूमिकांची काही दृष्ये चित्रित करून दाखवल्यावर रणवीर आणि अर्जूनच्या देखील ही बाब लक्षात आली.
आदित्य चोप्राची निर्मिती असलेला गुंडे चित्रपट १४ फेब्रुवारीला जगभर प्रदर्शित होणार आहे.        

Story img Loader