अभिनेता रणवीर सिंह हा कायमच त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो अंगावर एकही कापड न ठेवता केलेल्या नेकेड फोटोशूटमध्ये चर्चेत आला आहे. सर्वाधिक वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी इंटरनेटवर चर्चेत राहणारा हा अभिनेता ऑनस्क्रीन अभिनयाबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळे आणि हटके स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत असतो. यंदा मात्र तो कपडे न घालता केलेल्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीर सिंहने नेकेड (पूर्ण नग्नावस्थेत) फोटो शूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपड नसून तो पोज देताना दिसत आहे. रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करुन देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. काही फोटोंमध्ये रणवीर केवळ अंतर्वस्त्रावर दिसत आहे. नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.

Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

रणवीर सिंहने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ (?) पेपर मॅगझीनसाठी हे फोटोशूट केलंय, असं म्हणत डाएट सब्या नावाच्या व्हेरिफाइड इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आलेत. याचबरोबर रणवीरच्या मुलाखतीमधील काही वाक्यंही यासोबत शेअर करण्यात आली आहे. या पेजने दिलेल्या माहितीनुसार मुलाखतीमध्ये रणवीरने, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी फार कष्ट घेतले आहेत. मला चांगले कपडे घालायला, छान छान खायल आवडतं. मी दिवसातील २० तास काम करतो पण याबाबत कधी तक्रार करत नाही. मी या साऱ्यासाठी फार आभारी आणि कृतज्ञ आहे. मात्र यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागलेत. मी आज ‘गुची’ सारख्या ब्रॅण्डचे कपडे घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही ब्रॅण्डेड वापरु शकतो. तरीही यावरुन कोणी माझ्याबद्दल उलटसुटल बोलत असेल तर त्याची मी पर्वा करत नाही,” असं म्हटलंय.

याच मुलाखतीमध्ये पुढे रणवीरने चित्रपट, त्याची फॅशन याबद्दलही चर्चा केली आहे. इंटरनेटवर या फोटोंमुळे चर्चांना उधाण आलं असून अशापद्धतीचं फोटोशूट योग्य की अयोग्य यावरुन काहीजण वाद घालत असतानाच रणवीरच्या चाहत्यांनी मात्र त्यांच्या या हटके फोटोशूटचंही कौतुक केलं आहे. रणवीरने अशापद्धतीने फोटोशूट करुन दाखवलेली हिंमत ही कौतुकास्पद असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

Story img Loader