सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. या शोचा पहिला एपिसोड नुकतंच प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी हजेरी लावली. करोना काळानंतर पहिल्यांदाच करण जोहरचा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी रणवीर सिंगने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी त्याने उर्फी जावेदबद्दल भाष्य केले.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात करण जोहरने आलिया आणि रणवीरसोबत रॅपिड फायर राऊंड खेळला. यावेळी करणने रणवीरला इतर कलाकारांच्या फॅशन सेन्सबद्दल प्रश्न उपस्थित केले. एकदा वापरलेले कपडे पुन्हा न वापरणारा कलाकार कोणता? असा प्रश्न करणने रणवीरला विचारला. त्यावर रणवीरने एकही क्षण न घालवता लगेचच उर्फी जावेदचे नाव घेतले.
उर्फी जावेदचे नाव ऐकल्यावर आलियाला आश्चर्याचा धक्का बसला. तर करण हा जोरजोरात हसू लागला. यानंतर करण जोहरने आलियाला उर्फी जावेद कशासाठी प्रसिद्ध आहे याबद्दल सांगतो. तसेच ती कशाप्रकारचे कपडे वापरते याबद्दलचीही माहिती तो तिला देतो.
रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रणवीरचा दिलखुलास अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे. तर करण जोहर आणि आलिया भट्टची प्रतिक्रिया पाहून लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
‘ठेवाल ना मला सुखात?’ असा प्रश्न विचारत अभिनेत्री अमृता पवारने घेतला खास उखाणा, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची हुबेहूब नक्कल केली. त्याचं हे वागणं पाहून आलिया भट्ट आणि करण जोहर दोघंही हैराण झाले होते. याशिवाय रणवीरने आपल्या हुशारीच्या जोरावर रॅपिड फायर राउंडचं हॅम्पर देखील जिंकलं.