बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. विकी कौशलने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री कतरिना कैफसोबत लगीनगाठ बांधली. ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत आहेत. अनेकजण त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विविध प्रश्न उपस्थित करत असतात. नुकतंच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने एका कार्यक्रमात विकी-कतरिनाची खिल्ली उडवली आहे. ज्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या सोशल मीडियावर रणवीर सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फिल्मफेअर अवॉर्डदरम्यानचा आहे. हा फिल्मफेअर सोहळा रणवीर सिंगने होस्ट केला होता. यादरम्यान अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याचदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग हा विकी कौशलची खिल्ली उडवताना दिसत आहे. यात रणवीरने विकी कौशलला त्याच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. पण यावेळी रणवीर विकीला उद्देशून असं काही तरी म्हणाला ज्यामुळे तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.
आणखी वाचा : IIFA पुरस्कार सोहळ्यात एकटाच दिसला विकी कौशल, वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाला “कतरिना खूप…”

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत विकी हा या फिल्मफेअर सोहळ्यात पत्नी कतरिनासोबत बसल्याचे दिसत आहे. त्यावेळी रणवीर हा स्टेजवरुन विकीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी रणवीर म्हणाला, “विकी आपला लूक फारच सारखा आहे. आपण दोघेही टॉल, डार्क आणि हँडसम या कॅटेगरीत येतो. तसेच दोघेही परीकथेप्रमाणे स्वप्नवत आयुष्य जगत आहोत. तसेच आमच्या दोघात अजून एक साम्य आहे ते म्हणजे आम्ही दोघेही आईचे फार लाडके आहोत. आम्ही करण जोहरच्या तख्त या चित्रपटात काम करणार होतो. कारण आम्ही दिसायला सारखेच दिसतो. “

आणखी वाचा : विश्लेषण : न्यूड फोटोशूटबद्दल शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? जाणून घ्या

“इतकंच नव्हे तर मी आणि विकी आम्ही दोघांनीही जगातील सर्वात सुंदर मुलींशी लग्न केले. ज्या आमच्या आवाक्याबाहेर आहेत. तुझ्या या भावना मी नक्कीच समजू शकतो कारण अनेक लोक रोज मलाही हेच बोलतात.” रणवीरचे हे बोलणं ऐकून कतरिना आणि विकी जोराजोरात हसू लागले. त्यासोबत तिथे उपस्थित अनेकांमध्येही एकच हशा पिकला.

दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये शाही थाटात पार पडला. ते दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. पण हा संपूर्ण सोहळा ७ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या लग्नात कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या दोघांच्या लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले होते.