बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह त्याच्या कूल अंदाजासाठी ओळखला जातो. रणवीर येत्या काळात विविध सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सध्या तो एका टीव्ही शोमध्ये होस्टची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. ‘द बिग पिक्चर’ या क्विज शोमधून रणवीर होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. ज्यात रणवीरला अश्रू अनावर झाल्याचं दिसंतय.
‘द बिग पिक्चर’ या शोचा हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणवीर त्याच्या दिलखुलास अंदाजात डान्स करत मंचावर हजेरी लावताना दिसतोय. यानंतर त्याने स्पर्धकाचं स्वागत केलं. तर स्पर्धकाने त्याच्या आयुष्यातील संघर्ष सांगितला. वडिलांच्या निधनानंतर तीनही बहिणींनी भावाच्या शिक्षणासाठी त्यांचं शिक्षण सोडल्याचं स्पर्धकाने सांगितलं. त्यामुळे आता बहिणींसाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याचं स्पर्धक म्हणाला. स्पर्धकाचा हा संघर्ष ऐकून रणवीर भावूक झाला आणि त्याला अश्रू आवरणं कठीण झालं. यावेळी रणवीर मंचावरच रडू लागल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
“अर्धी टकली झाली”; शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत
तर यावेळी रणवीरने या स्पर्धकाच्या बहिणीसोबतही गप्पा मारल्या. यावेळी त्याने स्पर्धकाच्या बहिणीला समाल करत तिचं कौतुक केलं. रणवीरचं हे रुप पहिल्यांदाच अनेकांना पाहायला मिळणार आहे.
रणवीर सिंह लवकरच ‘८३’, ‘सर्कस’ या सिनेमातून झळकणार आहे. तर आलिय भट्टसह त्याने आगामी सिनेमा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.