विनोदाची विशिष्ट शैली आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणजेच अभिनेता गोविंदा. ८० ते ९०च्या काळात गोविंदाने हिट चित्रपटांची अक्षरक्ष: रांग लावली होती. पण ९०च्या दशकात गोविंदाला मिळालेले स्टारडम नंतरच्या काळात टिकू शकले नाही. आज गोविंदा चित्रपटांपासून लांब असला तरी सतत चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंहने गोविंदाचे पाय धरले असल्याचे दिसत आहे.
नुकताच गोविंदाने रणवीर सिंहच्या ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये हजेरी लावली. बॉलिवूडमधील दोन्ही एनर्जेटिक स्टार्सला एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या शोमध्ये रणवीर आणि गोविंदा मजामस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान, शोमध्ये गोविंदाने एण्ट्री करताच रणवीरने पाय धरले आहेत. सध्या त्यांचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : मालदिवमध्ये दिशा पाटनीचा जलवा, बोल्ड बिकिनी लूक व्हायरल
‘द बिग पिक्चर’ या शोमधील हा एपिसोड १ आणि २ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या भागाचा प्रोमो नुकताच कलर्स वाहिनीने प्रदर्शित केला आहे. व्हिडीओमध्ये रणवीर आणि गोविंदाने ‘यूपी वाला ठुमका’ या गाण्यावर डान्स केला आहे. शोमध्ये गोविंदाने फिल्मी डायलॉग बोलले आहेत. ते ऐकून रणवीर मजामस्ती करताना दिसतात.
रणवीर हा गोविंदाचा खूप मोठा फॅन आहे. तो अनेकदा गोविंदा विषयी बोलताना दिसतो. अशातच गोविंदाने ‘द बिग पिक्चर’मध्ये हजेरी लावल्यामुळे रणवीर आनंदी झाला आहे. गोविंदा आणि रणवीरने ‘किल दिल’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.