बॉलीवूडच्या बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले बाजीराव-मस्तानी या पोस्टरवर दिसत आहेत. बाजीरावांची भूमिका साकारत असलेला रणवीर सिंग आणि मस्तानीच्या भूमिकेतील दीपिका पदुकोण या पोस्टरमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. पोस्टरवरील दोन्ही व्यक्तीरेखांचा लूक, वेशभूषा यांमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखीनच भर पडली आहे. याशिवाय, पोस्टरवर काशीबाई यांच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रादेखील दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील एका गाण्यावरून संजय भन्साळी यांच्यावर बरीच टीका होत आहे. या चित्रपटातील अनेक संदर्भ चुकीचे असल्याचे आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट म्हणजे बाजीरावाचा चरित्रपट नव्हे. तर बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेने प्रभावित होऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. तो ना. स. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवर बेतला असल्याचे स्पष्टीकरण निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा