बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. रणवीर सिंह हा सध्या त्याच्या आगामी जयेशभाई जोरदार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या जन्माला येणार असलेल्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे.

सध्या रणवीर हा जयेशभाई जोरदार या चित्रपटाचे प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान रणवीरला त्याच्या बाळाबद्दल तसेच नावाबद्दल विचारण्यात आले. ‘जर भविष्यात तुला आणि दीपिकाला मुलगी झाली तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव काय ठेवणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रणवीर म्हणाला, “मी बाळाच्या नावाची एक लांबलचक यादी तयार केली आहे. पण एवढ्यात मी ती नावं उघड करणार नाही.”

zee marathi paaru serial purva shinde aka disha re enters in the show
‘ती’ पुन्हा आली! ‘पारू’ मालिकेत जुन्या खलनायिकेची रिएन्ट्री, लग्नमंडपात येणार अन्…; पाहा जबरदस्त प्रोमो
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं…
Paaru
अहिल्यादेवी व लक्ष्मीने खेळली फुगडी; ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका, पाहा व्हिडीओ
rashmika mandanna fracture 1
“तीन फ्रॅक्चर अन्…” रश्मिका मंदानाने तिच्या पायाच्या दुखापतीबद्दल दिली अपडेट; म्हणाली, “गेल्या २ आठवड्यांपासून…”
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…

प्रियांका चोप्रा-निक जोनसची लेक १०० दिवसांनी परतली घरी, फोटो शेअर करत म्हणाली “आमचे बाळ…”

“मला लहान मुलं प्रचंड आवडतात. मला त्यांची नाव फार हटके असावीत असे वाटते. आम्ही गेल्या काही दिवसांपासून यावर बाळाच्या नावावर चर्चा करत आहोत. पण ही नाव थोडी गुपित ठेवण्यात आली आहेत. कारण ती कोणीतरी दुसऱ्याने चोरुन ठेवावी, असे मला वाटत नाही”, असे रणवीर सिंह म्हणाला.

‘तुला मुलगा हवा की मुलगी?’ असा प्रश्न रणवीरला विचारला असता तो म्हणाला, “मुलगी असो किंवा मुलगा तो देवाचा खरा आशीर्वाद असतो. त्यामुळे मला काहीही झाले तरी चालेल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दीपिका ही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.”

Video : “आमच्या दोघांचा…”, राणादासोबत साखरपुडा झाल्यानंतर पाठकबाईंची खास पोस्ट

रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’मुळे चर्चेत आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या जन्माला येणार असलेल्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री शालिनी पांडेय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणवीर आणि शालिनी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात बोमन ईरानी आणि रत्ना पाठक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन दिव्यांग टक्कर यांनी केलं आहे. यशराज बॅनरची निर्मिती असलेला हा चित्रपट १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader