ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेही चर्चेत असणारी बॉलिवूड जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. एका चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी एकत्र आली आणि तेव्हापासून त्यांच्यात असलेलं मैत्रीचं नातं आणखी खुलत गेलं. आजच्या घडीला त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं असून, लवकरत ते लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. आगामी चित्रपट, लग्नाच्या चर्चा यांवर दोघांनीही मोकळेपणाने भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही प्रश्नोत्तरांनंतर ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘खलीबली’ या गाण्यावर थिरकण्याची विनंती उपस्थितांपैकी एकाने रणवीरला केली. डान्समध्ये दीपिकाने जर त्याला साथ दिली तरच नाचणार असल्याची अट रणवीरने ठेवली. रणवीरची अट मान्य करत दीपिकासुद्धा त्याच्यासोबत थिरकण्यास सज्ज झाली. रणवीरने तिला काही स्टेप्स समजावून सांगितल्या आणि मग दोघांनीही ‘खलीबली’ गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘पद्मावत’ चित्रपटात रणवीरने अलाऊद्दीन खिल्जी तर दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती.

वाचा : हा मीडिया ट्रायल कशासाठी; अन्नू कपूर यांचा तनुश्रीला सवाल

दीपिकाशी लग्नाबाबत प्रश्न विचारला असता रणवीर म्हणाला, ‘दररोज माझ्या लग्नाविषयी नवीन काहीतरी मला ऐकायला मिळत आहे. लग्नात मी कोणते कपडे परिधान करणार इथपासून ते गिफ्ट्सपर्यंतच्या गोष्टींची चर्चा होत आहे. माझ्या लग्नाबाबत काही ठरल्यास, तुम्हाला सर्वांत आधी मी कळवेन.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh deepika padukone shake a leg to padmaavat song khalibali watch video