बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या प्रेमसंबंधांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. त्यामुळे त्यांचे चाहतेही नाराज झाले होते. पण, आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतेच हे दोघेजण एका कारच्या शोरूममध्ये किस करताना दिसले. हे शोरूम दीपिका पदुकोणच्या अगदी घराजवळ आहे. काही संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेजण कोणती कार घ्यावी याबाबतही चर्चा करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

रणवीर-दीपिका हे कार शोरुममध्ये गेले त्यावेळी प्रसारमाध्यमांपैकी फारसं कोणी नव्हतं. मात्र, तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी कोणाचीही पर्वा न करता हे दोघं एकमेकांना किस करत होते असे सांगितले. त्यामुळे कोणाचीही पर्वा न करता, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ या गाण्याच्या शब्दांना बहुदा या दोघांनी फारच मनावर घेत ते उघडपणे प्रेम व्यक्त करतानाचे चित्र पाहावयास मिळाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या बातमीमुळे रणवीर-दीपिकाच्या ब्रेकअपच्या चर्चेवर आता पूर्णविराम लागला आहे.

सध्या, रणवीर सिंग हा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. तर, दुसरीकडे दीपिका तिच्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटाची जोरात प्रसिद्धी करत आहे. यात ती हॉलीवूड अभिनेता विन डिझेल याच्यासोबत काम करताना दिसेल. तसेच, रणवीर आणि दीपिका लवकरच संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहेत. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटानंतर हे दोघे पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे एकत्र रुपेरी पडद्यावर झळकतील. मात्र, या चित्रपटात हे दोघं रोमान्स करताना दिसणार नाहीत. ‘पद्मावती’ हा चित्रपट चित्तोरचे राजा रतन सेन यांच्या पत्नी राणी पद्मिनी यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारणार असून शाहिद तिच्या पतीच्या भूमिकेत दिसेल. तर रणवीर सिंग हा पद्मावतीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात दीपिका शिवाय अदिती राव हैदरी देखील झळकणार आहे. अर्थातच अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तूळात रंगत आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट ऐतिहासिक काळावर आणि पात्रांवर भाष्य करणाऱ्या कथानकावर आधारित असणार आहे.