संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर प्रदर्शनापूर्वी बराच वाद रंगला होता. मात्र याच चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारावर आपली छाप उमटवली आहे. या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकवत फिल्मफेअरमध्ये बाजी मारली. फिल्मफेअर पुरस्कार पटकाविलेल्या विजेत्यांची यादीः
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीरसिंग (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – दीपिका पदुकोण (पिकू)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – बाजीराव मस्तानी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शक – नीरज घेवान (मसान)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री – भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेता – सुरज पांचोली (हिरो)
समीक्षकांनी निवडलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट – पिकू
समीक्षकांनी निवडलेला सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमिताभ बच्चन (पिकू)
समीक्षकांनी निवडेलली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (दिल धडकने दो)
जीवनगौरव पुरस्कार – मौसमी चॅटर्जी
सर्वोत्कृष्ट संगीत – अंकित तिवारी, मीट ब्रॉस अंजान आणि अमाल मलिक (रॉय)
सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल (दिवानी मस्तानी- बाजीराव मस्तानी
सर्वोत्कृष्ट गायक – अरिजित सिंग (सुरज डुबा है- रॉय)
सर्वोत्कृष्ट कथा – विजयेंद्र प्रसाद (बजरंगी भाईजान)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा