अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. आम्ही दोघ एकत्र फिरतो म्हणजे आमच्यात प्रेमसंबंध आहेत असा याचा अर्थ होत नाही, असे रणवीरचे म्हणणे आहे.
दीपिका पदुकोण व माझ्यात प्रेमसंबंध नसून आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे मत अभिनेता रणवीर सिंह याने व्यक्त केले आहे. दीपिका माझी चांगली मैत्रीण आहे. माझ्या आयुष्यात तिला विशेष स्थान आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आहे, असे रणवीर म्हणाला. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलिया रासलीला रामलीला’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत होते.

Story img Loader