गेला आठवडाभर डेंग्यूमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेला अभिनेता रणवीर सिंग याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला डॉक्टरांनी गुरुवारी (३ ऑक्टोबर) घरी पाठवले आहे. मात्र, त्याला किमान १५ दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.
रणवीर घरी जात असताना त्याच्या चाहत्यांनी आणि पत्रकारांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी तो फार थकलेला दिसत होता. प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. निर्मात्यांना कोणताही तोटा सहन करावा लागू नये, यासाठी तो लवकरच त्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. रणवीरचा ‘राम लीला’ हा चित्रपट काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. तो आजारी पडल्यामुळे ‘राम लीला’च्या प्रमोशन आणि डबिंगवर परिणाम झाला आहे. तसेच, चित्रपटाच्या संगीताचे अनावरणही पुढे ढकलण्यात आले आहे.

Story img Loader