बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला येत्या काही दिवसांत पडद्यावर रॅप करताना पहायला मिळणार आहे. स्वत: रॅप नृत्यप्रकाराचा चाहता असलेल्या रणवीरने ‘चिंग्स सिक्रेट’ या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी रॅप केल्याचे समजते. या वृत्ताला रणवीरच्या अधिकृत प्रवक्त्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. या रॅप गाण्याचे शब्द गुलजार यांनी लिहले असून त्यास रणवीरने त्याच्या स्टाईलमध्ये मंचाऊ रॅप केला आहे. विशेष म्हणजे या जाहिरातसाठी तयार करण्यात आलेल्या जिंगलला शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने संगीत दिले आहे. प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे या जाहिरातीचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले असून, नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्यचे आहे. मागील आठवड्यात सोशल साईटस आणि चित्रपटगृहात ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली.
 

Story img Loader