वर्षभर दाढी मिश्यांच्या लूकमध्ये मिरवत असलेल्या रणवीरने अखेर त्या लूकला शुक्रवारी राम राम ठोकला. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील बाजीराव पेशवे यांच्या भूमिकेकरिता रणवीरने दाढी मिश्या वाढविल्या होत्या.
पाहाः दीपिकाने कापल्या रणवीरच्या मिश्या!
पण आता दाढी मिश्या काढल्यानंतर आपल्याला जरा विचित्र वाटत असल्याची भावना रणवीरने व्यक्त केली आहे. शुक्रवारी रणवीरने त्याची ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील सहकलाकार आणि तथाकथित प्रेयसी दीपिका पदुकोण त्याच्या मिश्या कापत असल्याचा व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर त्याने संपूर्णपणे दाढी मिश्या काढूनच टाकल्या. यावर रणवीर म्हणाला की, मला खूप विचित्र वाटतंय. तुमच्यापैकी ज्यांना मिश्या असतील त्यांना माहितच असेल की आपल्याला मिश्या असल्यावर किती वेगळ वाटत. मी शुक्रवारीच माझ्या मिश्या काढल्या आणि त्यानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर आलो आहे. बाजीराव लूकमध्ये मी जवळपास १४ महिने होतो. माझ्या डोक्यावर केवळ शेंडी होती आणि गेले सात-आठ महिने मी मिश्या वाढविल्या होत्या. पण आता मला खूप वेगळ वाटतंय. या नवीन लूकची सुद्धा मला हळूहळू सवय होईल.
रणवीर लवकरच आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. यासंबंधी बोलताना तो म्हणाला की, फेब्रुवारी-मार्चमध्ये ‘बेफिक्रे’चे शूट सुरु होईल. त्यामुळे माझे केस लवकर वाढतील अशी मी अपेक्षा करतोय. तसेच, माझ्या चॉकलेट बॉय लूकला पसंती मिळेल अशी माझी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा