यशाच्या शिखरावर असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणवर सध्या माध्यमांची बारीक नजर आहे. यातच आता दीपिकाच्या गळ्यातील नव्या पेंडेन्टकडे लक्ष्य वेधले गेले आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यावरून ती परतल्यापासून तिच्या गळ्यात एक नवं पेंडेन्ट असून त्यावर ‘लव्ह’ असे लिहलेले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका हे आयफा सोहळ्यासाठी यूएसमध्ये गेले होते. तेव्हा रणवीरने तिला एक सोन्याचं पेंडेंट भेट स्वरुपात दिले. या पेंडेंटवर इंग्रजीमध्ये ‘LOVE’ असे लिहिलेले असून सध्या दीपिकाच्या गळ्यात हे पेंडेन्ट नेहमीच दिसत आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये रणवीर आणि आपल्यात केवळ मैत्रीचे संबंध असल्याचे दीपिकाने म्हटले होते. मात्र, या शोचा सूत्रसंचालक करण जोहर हा देखील यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता की, या दोघांमध्ये केवळ मैत्री आहे.

आयफा सोहळ्यासाठी टम्पा बे ला गेल्यावरही हे दोघे एकत्र बाहेर फिरत होते. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय शिजतय याच विचारात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. या पुरस्काराआधी नवी दिल्लीतील दीपिकाच्या सेल्फी फोटोमध्ये आरशात रणवीरचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. दीपिका आपले प्रेम व्यक्त करण्यापासून कधीच धजावलेली नाही. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरसोबत प्रेमसंबंध असताना तिने मागच्या बाजूला मानेवर आरके असे कोरून घेतले होते. मात्र, या दोघांमधील ब्रेकअपनंतर तिने या टॅटूला फुलांचे रूप येईल असे पुन्हा डिझायन करून घेतले. पण, यावेळेस दीपिकाला आपल्या पहिल्या प्रेमापासून धडा मिळाला आहे असं वाटतं. त्यामुळे टॅटू काढण्यापेक्षा गळ्यात पेंडेन्ट घालून आपलं प्रेम व्यक्त करणं जास्त सोयीस्कर वाटल्याच दिसत.

Story img Loader