रणबीर कपूर नुकताच बंगळुरूमध्ये पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात गेला होता. ‘SIIMA’ (South Indian International Movie Awards) हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पुरस्कार सोहळा बंगळुरूमध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हजर होता. SIIMA या पुरस्कार सोहळ्याला अल्लू अर्जुन, शिवा राजकुमार, विजय देवरकोंडा, नवीन पॉलीशेट्टी यांच्यासह दक्षिणेकडील अनेक कलाकार उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंगच्या ‘पुष्पा’ स्टाईलवर अल्लू अर्जुन फिदा; व्हिडीओ व्हायरल

खरं तर, रणवीरच्या गालावर गर्दीत कोणीतरी थापड मारली होती, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बंगळुरूमध्ये अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या रणवीर सिंगबरोबर ही घटना घडली. रणवीरला चाहत्यांपैकी कुणीतरी मारल्याचं म्हटलं जात होतं. पण रणवीरला गर्दीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्याच्याच बॉडीगार्डचा हात त्याच्या गालावर लागल्याचं सांगण्यात येत आहे. गालावर लागल्यानंतरही रणवीरने चेहऱ्यावरील हावभावात मात्र बदल होऊ दिला नाही.

दरम्यान, या सोहळ्यामध्ये रणवीरला ‘दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदी अभिनेता’ हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबरोबरचा एक फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहे. “एक कलाकार म्हणून मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. देशामध्ये असलेली ही सांस्कृतिक विविधता मला फार आवडते. दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. एक असा काळ होता, जेव्हा भाषेचा अडथळा व्हायचा. पण आता अशी कोणतीच बाब राहिलेली नाहीये,” असं तो म्हणाला.

सायकल पंक्चर झाल्यानं रिक्षातून जावं लागलं घरी; या अभिनेत्याला ओळखलंत का?

या पुरस्कार सोहळ्यात रणवीरने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील सुप्रसिद्ध डायलॉग त्याच्यासमोरच म्हणून दाखवला. तसेच तो सूत्रसंचालकांसह अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ या गाण्यावरही डान्स करताना दिसला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh got slapped on face by bodyguard at siima red carpet video viral hrc