बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आज चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तो आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असला तरीही त्याचे पाय जमिनीवरच असल्याचे आपण पाहतो. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळेच त्याचे असंख्य चाहते आहेत.
तुम्हाला माहित आहे का रणवीरला बॉलीवूडमध्ये जम बसवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती. त्याने सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी ऑडिशनही दिले होते. त्यापैकी एका ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात तो काही डान्स स्टेप्स करताना दिसतो. त्याचे हे नृत्य पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या मंडळींना आपले हसू अनावर झालेले यात दिसते. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ.

Story img Loader