बॉलीवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रणवीर सिंगने त्याच्या अभिनयात बरेच बदल घडवून आणले. अभिनेतापासून ते उत्कृष्ट अभिनेता बनण्याकडे त्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. मात्र, त्याची एक सवय बदलणं त्याला फार कठीण जातेय. उशीरा उठण्याची सवय मोडण्याचा रणवीर प्रयत्न करतोय पण त्याला ते काही जमत नाहीये. जीएपी स्टोअर लॉन्चवेळी रणवीर पत्रकारांशी बोलत होता त्यावेळी त्याने याबाबत सांगितले.
रणवीर म्हणाला की, पहाटे लवकर उठणा-या व्यक्तींपैकी मी अजिबात नाहीये. दुपारी १२ पूर्वी माझं इंजिन सुरुचं होत नाही. माझं डोक दुपारी १२ पूर्वी काम करत नाही. पण, मी माझी ही सवय बदलण्याचा प्रयत्न करतोय. जो व्यक्ती पहाटे लवकर उठतो तो त्याच्या कामातही अधिक चपळ असतो. माझी सवय बदलण्यासाठी प्रेरणा देणा-या व्यक्तींच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रयत्न करतोय पण त्याचा फरक जाणवत नाहीये. माझी सवय बदलण्यासाठी मी अजून जास्त प्रयत्न करणार असल्याचेही तो पुढे म्हणाला.
२०१५ साल रणवीरसाठी यशस्वी होते. ‘दिल धडकने दो’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांनी तिकीट बारीवर चांगली कमाई केली. आता तो आदित्य चोप्राच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटात वाणी कपूरसोबत रोमान्स करताना दिसेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा