बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. रणवीरनं ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती. त्याच्या या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर बरेच मीम्स देखील शेअर करण्यात आले. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र त्याच्या या फोटोशूटचं कौतुक केलं होतं. पण आता हे फोटोशूट करणं रणवीरला महागात पडणार असल्याची चर्चा आहे. या फोटोशूटनंतर मुंबई पोलीसांकडे रणवीरच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इंडिया टूडे’नं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील एका पोलीस ठाण्यात एका एनजीओकडून रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या एनजीओकडून करण्यात आला आहे. रणवीरच्या या फोटोशूटनंतर देशाच्या राजकारणातही याचे पडसाद उमटले होते. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र चीफ अबू आझमी यांनी रणवीरच्या या फोटोशूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “जर लोकांसमोर न्यूड होणं ही कला आणि स्वतंत्र्य असेल तर मग बुरखा परिधान करणं ही महिलांवर जबरस्ती का आहे?” असा सवाल केला होता.

आणखी वाचा- दाक्षिणात्य अभिनेत्याचं रणवीर सिंगच्या पावलावर पाऊल, केलं न्यूड फोटोशूट

दरम्यान रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अर्जुन कपूरनं देखील रणवीरला पाठिंबा दिला होता. या फोटोशूटबद्दल बोलताना तो, “जर रणवीर हे सर्व करून आनंदी असेल तर याचा आपणही सन्मान करायला हवा.” असं म्हणाला होता. याशिवाय अभिनेत्री आलिया भट्टने देखील रणवीरच्या या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. आलिया म्हणाली, “मी माझा आवडत्या सहकलाकार रणवीर सिंगबद्दल कोणतीही नकारात्मक चर्चा सहन करु शकत नाही. त्यामुळे मी हा प्रश्नदेखील सहन करु शकत नाही.”

दरम्यान एका मुलखातीत रणवीरनं त्याला त्याच्या कपड्यांवरून किंवा फॅशन सेन्सवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता, “लोक माझ्याबद्दल किंवा मी कोणते कपडे परिधान करतो याबद्दल काय बोलतात यामुळे मला अजिबात फरक पडत नाही. मला जे कपडे आवडतात ते मी घालतो. मला जे खाणं आवडतं ते मी खातो. जर ही गोष्ट एखाद्याला आवडत नसेल तर त्यासाठी मी काहीच करू शकत नाही.”